जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
उदगीर : कोरोना या रोगाचा संसर्ग वाढत चालल्याने संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. तरीही काही व्यापारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामीण पोलिसांनी एका भाजी विक्रेत्यास व किराणा दुकानदारवर संचारबंदीच्या नियमानुसार दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर ग्रामीण हद्दीत दि.१७ जुलै रोजी ८:१५ वाजता नुर काॅलनी, कल्पना चौक येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असूनही भाजी विक्रीचे दुकान चालू ठेवुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने व मानवी जीवन धोक्यात येईल असे कृत्य केल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नामदेव सारोळे यांच्या फिर्यादीवरुन भाजी विक्रेते दुकानदार मुजीन मैनोद्दीन बागवान रा.नुर काॅलनी, उदगीर यांच्यावर. गुरनं २७१/२० क १८८, २६९ भादवीसह कलम ११ महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० व कलम २, ३, ४,
साथीचे अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.काॅ. कुलकर्णी करीत आहेत. तर दुस-या घटनेत उदगीर तालुक्यातील तोंडचिर येथे किराणा दुकान दुपारी १२:१० चालु ठेवल्याने ग्रामीणचे पो.हे. काॅ. शिवाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन राम बबन जाधव रा.तोंडचिर यांच्यावर मास्क न लावता किराणा दुकानातील माल विक्रीसाठी चालु ठेवुन संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरनं २७२/२० क १८८, २६९ भादवीसह कलम २, ३, ४, साथरोग प्रतिबंध कायदा कलम ५२ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो.ना. घोडके करत आहेत.