देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?

देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...


 


प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?


 


देवणी : शहरासह  परिसरातील अनेक गावांमध्ये  टप्प्या -टप्प्यावर  बनावट,  मेड इन गोवा दारूचे  दुकाने थाटल्याची चर्चा गल्लीबोळात चालु झाली आहे.


गंमत म्हणजे चांगल्या भारी समजल्या जाणार्‍या कंपनीची दारू अगदी स्वस्तात मिळु लागल्याने देवणी परिसरातील तळीरामांना पर्वणी भेटली की काय ?अशी शंका येत आहे.मात्र ग्रामिण भागात एक म्हण आहे, स्वस्तातील दारू म्हणुन ही बनावट,बोगस दारू पिणार्‍यांची होण्याची शक्यता आहे.कोणी जगले काय?आणि कोणी मेले काय? अशी भुमिका घेऊन मयताच्या टाळुवरचे लोणी खाण्यासाठी सरसावलेल्या या बनावट दारू बनवणारे,विक्री करणारे केवळ स्वार्थ साधण्यासाठी तळीरामांच्या जीवनाशी खेळत आहेत.


गंमत म्हणजे देवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बनावट,भेसळयुक्त दारू बनवली जाते,जणु कारखानाच आहे!आणि ही बाब पोलिस प्रशासन,राज्य उत्पादन शुल्क विभागाला चांगल्या प्रकारे माहिती आहे!असे असतांना देखील ही कारखानदारी चालते कशी?असा भाबड्या जनतेला प्रश्न पडलेला आहे.


 शहरासह परिसरातील  नागरिकांच्या हाताला काम नसतांना देखील तळीराम हे उसनवारी व कर्ज काढून स्वस्तात मिळणारी बनावट टॅंगो पंच, मेड इन गोवा  हे भेसळयुक्त दारू सेवन करीत आहेत.परिणामत: याचा त्रास  कुटुंबातील सर्व सदस्यांना होत आहे. 


देवणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इंग्लिश व बनावट देशी दारुच्या  गोरखधंद्यावर लगाम लावण्याची  मागणी केली होती.  पण या मागणीकडे  राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व देवणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था संभाळणारे कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर कानाडोळा केल्यामुळे पुन्हा देवणी तालुक्यातील  मौजे तळेगाव मार्ग देवणी शहरांमध्ये  बनावट  इंग्लिश, व देशी दारुचा  सुळसुळाट चालु  आहे. 


देवणी येथे इंग्लिश व देशी दारू चा सुळसुळाट केल्याची चर्चा होतांना  पाहण्यास मिळाले. देवणी शहरासह  परिसरात टप्प्याटप्प्यावर  देशी दारूचे दुकाने थाटल्याचे चित्र  पाहण्यास मिळत आहेत.  सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवत या अवैध धंद्यावर बंदी घालून चालवणाऱ्या मालकावर आणि त्यांना सप्लाय करणाऱ्या  बनावट इंग्लिश व देशी दारू  मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी  केली आहे. या अवैध धंद्यावर प्रशासनाकडून कधी लगाम बसणार  का? नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व वरिष्ठ अधिकारी यात लक्ष  घालणार का?असा सवाल देवणी शहरासह तालुक्यातील नागरिक करीत आहेत .


देवणी परिसराला या अवैध दारूचे लागलेले ग्रहन कधी सुटेल?असा प्रश्न जनतेला पडला आहे.तरूण पिढी स्वस्तात दारू भेटतेय ,म्हणुन दारूकडे आकर्षित होत आहेत.तरूण पिढीचे आयुष्य बरबाद होत असतांना पोलिस प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.


 


Popular posts
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
नवरात्रीमध्ये आरोग्यप्राप्ती : डॉ. भाग्यश्री घाळे