नवरात्रीमध्ये आरोग्यप्राप्ती : डॉ. भाग्यश्री घाळे

नवरात्रीमध्ये आरोग्यप्राप्ती : डॉ. भाग्यश्री घाळे


   शास्रात सांगीतले गेले आहे कि प्रत्येक युगात महामारीरूपी दानवाचे अंत करण्यास आदिशक्ती वेगवेगळ्या रूपात येते. कोरोना नामक या वैश्विक महामारीचेही आई दुर्गेच्या आगमनाने अंत होईल या दृढ आस्थेसोबत नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे. नवरात्रीचा हा काळ केवळ संस्कृती,आस्था भक्तीचे प्रतीक नसून आपल्या आरोग्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे. पावसाळा संपून थंडीचे दिवस येतायत,ऋतुबदलाचा, ऋतुसंधिचा हा काळ आहे.त्यानुसार आपले खानपान हि बदललायला हवे.


९ दिवसांचे उपवास हे केवळ श्रद्धा म्हणून,नियम नसून आपली जाठराग्नी, पाचनसंस्था शुद्ध, स्वस्थ होण्यासाठी आहे. काही गोष्टींची काळजी घेतल्यास,योग्य तो आहार घेतल्यास नक्कीच उपवासाचा फायदा होतो.


फक्त चिप्स, तळलेले बटाटे , शाबुदाणा खिचडी यांच्याऐवजी, तळीव पदार्थांऐवजी भाजणीचे, उकडीचे पदार्थ आहारात घेण्याचा प्रयत्न करावा. जसे भगर/शाबुदाणा पिठाची इडली,ढोकळा, उकडलेले रताळे, भोपळ्याची खीर,शिंगाड्याच्या पिठाचे थालीपिठ. अशा पदार्थांमुळे अॅसिडिटी वाढणार नाही, तेलकट खाल्ल्यामुळे होणारे अपचन, मळमळी, ओकारी हा त्रास ओणार नाही व पौष्टीकांशहि मिळत राहतील.


गुळ शेंगदाण्याचे लाडू.


निर्जला व्रत शक्यतो करू नये.रोगराईचे काळ आहे,हायड्रेटेड रहावे.


उच्चरक्तदाब असलेल्यांनी , मधुमेहींनी उपवास करू नये, करायचेच असल्यास आहाराचे योग्य नियोजन करावे, नाष्टा चुकवू नये, चहा कॉफी घेऊ नये. लिंबुपाणी प्रत्येक ३ तासांनी घेत रहावे.


गर्भिणी/गरोदर स्त्रि-प्रथम ३ महिने असता उपवास करू नये. आपण घेतलेल्या आहारातूनच गर्भाचे पोषण होत असते. त्यामुळे कडक उपवास करू नये. भरपूर दुध घ्यावे,दुधाची खीर घेत रहावे.फलाहार घ्यावा, चिप्स, नायलॉन शाबुदाणा खाण्याचे टाळावे.ताज्या फळांचे सेवन करावे.फार धावपळ करू नये.कसलाही व्यायाम करू नये,थोडावेळ प्राणायाम केल्यास चालेल.तुपाचा वापर प्रत्येक पदार्थात करावा.


या सणानिमित्ताने साफसफाई, सारवण करणे, घटस्थापणेसाठी सुचीर्शुद्धी या सर्वांमध्ये सर्व ताईमाईंची नक्कीच दमछाक होते. रात्री झोपताना तळपायाना हलक्या हाताने तेल लावायचे विसरू नये.आदिशक्ती ज्याप्रमाणे या संसाराचे भरणपोषण करते त्याचप्रमाणे आपणही आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करता,त्यासाठी स्वतःच्या आरोग्यचीही काळजी घेणे ही टॉप प्रायरिटी सेट करा,आपण स्वस्थ असणार तरच इतरांची काळजी घेऊ शकणार


होमहवन करण्याने मनःशुद्धी आत्मशुद्धी तर होतेच सोबत तुप व वापरलेल्या द्रव्यांमुळे आपले वातावरण,वायुशुद्धीही होते. शारिरीक उर्जेसोबतच ध्यान अर्चना करून आध्यात्मिक उर्जेचाही या काळात नक्कीच संचय करावा. 


नवदुर्गा आपल्या आयुष्यातील दुष्टाचा, अंधकाराचा नाश करो,विश्वास या कोरोना नावाच्या असुरारापासून मुक्ती मिळवून देवो हि प्रार्थना।


शतायु भव...


डॉ.भाग्यश्री घाळे


शतायु आयुर्वेद, ब्राईट स्टार कॅम्पस, बिदरगेट, उदगीर


Shatayu Ayurved Clinic Bright Star High School, Udgir 


Popular posts
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?