अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाला अहवाल सादर करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाला अहवाल सादर करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे



   लातूर :  जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापूर्वी अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.


  निलंगा तालुक्यातील नामेजवळगा, कासारशिरसी सावरी तर औसा तालुक्यातील मातोळा या गावातील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांची पाहणी राज्यमंत्री बनसोडे यांनी केली. यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, अवसा रेनापुर चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार व संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


      राज्यमंत्री बनसोडे यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर या पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली व सदरील नुकसानीचे पंचनामे संबंधित विभागाने तात्काळ पूर्ण करावेत व त्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर करावा. आपल्या जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना अवगत करून आपल्या जिल्ह्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


      या अतिवृष्टी ने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे राज्यमंत्री बनसोडे यांनी आश्वस्त केले. तसेच ज्या गावातील रस्ते वाहून गेलेले आहेत तसेच घरांची पडझड झालेली आहे अशा लोकांना व गावांना ही मदत देण्यात येणार असून वाहून गेलेल्या रस्ते दुरुस्तीचे कामेही ही त्वरीत करण्याबाबत सूचित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


      जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे, रस्त्यांचे व घरांच्या नुकसानीबाबत ची माहिती राज्यमंत्री यांना यावेळी दिली. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व तालुकास्तरीय व ग्रामस्तरावरील यंत्रणांना प्रत्येक गावात व प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्यानुसार पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.


           


Popular posts
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
नवरात्रीमध्ये आरोग्यप्राप्ती : डॉ. भाग्यश्री घाळे